27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयगोमूत्रामुळे भूतबाधा दूर होते?

गोमूत्रामुळे भूतबाधा दूर होते?

एकमत ऑनलाईन

मेरठ : उत्तर प्रदेशचे पशुसंवर्धन आणि दूग्धविकास मंत्री धरमपाल सिंह सध्या चर्चेत आले आहेत. मेरठमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलताना धरमपाल यांनी गोमुत्राचे फायदे सांगतल्यामुळे चर्चेत आले आहेत. गोमूत्र शिंपडल्याने भूतबाधा आणि वास्तुदोष यांसारख्या समस्या दूर होतात असे वक्तव्य त्यांनी केले आहे. प्रसार माध्यमांशी संवाद साधताना धरमपाल सिंह म्हणतात की, गायीमध्ये पाच पदार्थ असतात.

गाईचे दूध, गाईचे दही, गाईचे तूप, गाईचे शेण आणि गोमूत्र. गाईच्या शेणात लक्ष्मीचा वास असतो आणि गंगामैया गोमूत्रात वास करते. गोमूत्र शिंपडल्यास भूतबाधा किंवा वास्तुदोष यांसारख्या सर्व समस्या दूर होतात. धरमपाल सिंह पुढे म्हणाले की, राज्यभरात रस्त्यांवर फिरणा-या जनावरांसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक गावात चारा बँक स्थापन करण्याची योजना आहे. गाईंचे शेण विकून सीएनजीचे उत्पादन करण्याची योजना आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या