16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeक्रीडागोव्यात घर : युवी अडचणीत ; पर्यटन विभागाची नोटीस

गोव्यात घर : युवी अडचणीत ; पर्यटन विभागाची नोटीस

एकमत ऑनलाईन

पणजी : मोरजिम येथील व्हिला होमस्टे म्हणून नोंदणी न करता व्यावसायिक वापरासाठी चालवल्याप्रकरणी भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग अर्थात युवी मंगळवारी अडचणीत आला. गोव्याच्या पर्यटन विभागाने त्याला या प्रकरणी नोटीस बजावत ८ डिसेंबर ला सुनावणीसाठी हजर राहण्याचे फर्मान बजावले आहे. गोवा पर्यटन व्यापार कायद्यांतर्गत मालमत्तेची नोंदणी न केल्याबद्दल एक लाख दंड का आकारू, अशी आशयाची नोटीस युवीला बजावण्यात आली आहे.

गोवा पर्यटन व्यवसाय कायदा १९८२ अन्वये, नोंदणीनंतरच राज्यात होमस्टे चालवता येतो. उत्तर गोव्यातील मोरजिम येथील युवराजच्या मालकीचा कासा सिंग ठिकाणवर या प्रकरणात ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

कासा सिंग याच पत्त्यावर १८ नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या नोटीसमध्ये राज्याच्या पर्यटन विभागाचे उपसंचालक राजेश काळे यांनी युवराजला ८ डिसेंबर ला सकाळी ११ वाजता वैयक्तिक सुनावणीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

वर्चेवाडा, मोरजिम, पेरनेम, गोवा येथे असलेले तुमचे निवासी संकुल कथितपणे होमस्टे म्हणून कार्यरत आहे. ते एअर बी. एन. बी. सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर बुकिंगसाठी उपलब्ध, असे निदर्शनास आले आहे. असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. दरम्यान विभागाने युवराजच्या एका ट्विटचाही संदर्भ दिला. ज्यात त्याने म्हटले आहे की तो त्याच्या गोव्यातील घर सहा लोकांना होमस्टसाठी देणार असून त्याचे बुकिंग फक्त एअर.बी.एन.बी. वर असेल असे म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या