हेराल्ड : व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी घरच्यांना न सांगता गोव्यात गेलेल्या एका प्रेमीयुगुलाचा गोव्यातील समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे प्रेमीयुगुल मूळचे उत्तर प्रदेशमध्ये राहणारे होते. ही घटना दक्षिण गोव्यातील पालोलेम समुद्रकिना-यावर ही घटना घडली. प्रेमीयुगुल बुडत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांनाही किना-यावर आणले.
पोलिसांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदन अहवालासाठी मृतदेह पाठविण्यात आले आहेत.
मृत मुलीचे नाव सुप्रिया दुबे (२६) आणि मुलाचे नाव विभू शर्मा (२७) असल्याचे कळते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रेमीयुगुल उत्तर प्रदेशमध्ये राहणारे होते. व्हॅलेंटाईनच्या आधीच ते गोव्यात आले होते. मृत सुप्रिया दुबे सध्या बंगळुरू येथे राहत होती. तर विभू शर्मा हा मुंबईत राहत होता.