36.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeराष्ट्रीयगोव्यात भाजपमध्ये बंडखोरी

गोव्यात भाजपमध्ये बंडखोरी

एकमत ऑनलाईन

पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पक्षाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने उमेदवारी दिलेली नाही. यामुळे पार्सेकर भाजपवर नाराज आहेत. पार्सेकर २०१४ ते २०१७ दरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री होते. त्यांच्यासह इतर ब-याच नेत्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत मोठा धक्का दिला.

माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना भाजपने उमेदवारी दिली नाही. त्यामुळे नाराज पार्सेकर भाजपला आव्हान देण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. अपक्ष म्हणून ते निवडणूक लढवू शकतात. भाजपने मंड्रेम विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार दयानंद सोपटे यांना उमेदवारी दिली. मागच्या निवडणुकीत कॉंग्रेसमध्ये असलेल्या सोपटे यांनी पार्सेकर यांचा पराभव केला होता. त्यानंतर ते भाजपत दाखल झाले.

याशिवाय उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्या पत्नी सावित्री कवळेकर याही अपक्ष निवडणूक लढणार आहेत. उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तसेच पीडब्ल्यूडी मंत्री दीपक पोस्कर यांनीही भाजपची उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष निवडणूक लढणार आहेत. तसेच गोव्याचे उपसभापती इसिडोर फर्नांडिस यांनीही भाजपचा राजीनामा दिला आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या