नवी दिल्ली : बेंगळुरू विमानतळावर ५५ प्रवाशांना सोडून उड्डाण केल्याप्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालयाने शुक्रवारी गो फर्स्ट एअरलाइनलाही १० लाख रुपयांचा दंड ठोठावत विमान कंपनी व्यवस्थापकाला कारणे दाखवा नोटीस बजावली.
गो एअरच्या जी. ८-११६ या बंगळूर- दिल्ली फ्लाइटने ९ जानेवारी ला ५५ प्रवाशांना विमानतळावरच सोडून दिल्लीकडे उड्डाण केले होते. या सर्व प्रवाशांकडे चेक इन आणि बोर्डिंग पास असतानाही विमान त्यांना न घेताच निघून गेले होते. या घटनेनंतर प्रवाशांनी ट्विटरवर विमान कंपनीला जाब विचारत पंतप्रधान कार्यालय आणि नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना टॅग केले होते. त्यानंतर शुक्रवारी विमान कंपनीवर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली.