36.4 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeराष्ट्रीयगौतम गंभीर कोरोना पॉझिटिव्ह

गौतम गंभीर कोरोना पॉझिटिव्ह

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर आणि सध्या भारतीय जनता पक्षाचा खासदार गौतम गंभीर याला कोरोनाची लागण झाली आहे. गंभीरने सोशल मीडियावर या संदर्भात एक पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी आणि सुरक्षित रहावे असे आवाहन त्याने केले आहे.

पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणा-या गंभीरने ट्वीट करून कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली. काही सौम्य लक्षणे जाणवल्यावर मी कोरोनाची चाचणी करून घेतली. ज्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी स्वत:ची टेस्ट करून घ्यावी आणि सुरक्षित रहावे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या