23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeनांदेडकंधार येथे शिबिरात २२५७ रुग्णांनी घेतला लाभ

कंधार येथे शिबिरात २२५७ रुग्णांनी घेतला लाभ

एकमत ऑनलाईन

कंधार : आजादी का अमृत महोत्सवा निमित्त कंधार ग्रामीण रुग्णालयाच्या वतिने भव्य महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरत हजारो नागरीकांनी आपल्या विविध आजाराची तपासणी करुन लाभ घेतला. कंधार ग्रामीण रुग्णालया मार्फत आरोग्य महाशिबीर घेण्यात आले या महाशिबिराला तालुक्यातील हजारो नागरिंकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. कंधार ग्रामीण रुग्णालयाकडुन पहिल्यांदाच एवढे मोठे आरोग्य शिबिर घेण्यात आले. हे शिबिर नियोजनबध्द पार पाडल्याने वैद्यकीय अधिक्षक डॉ.सुर्यकांत लोणीकर व त्यांच्या टिमचे कौतुक होत आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजना आयुष्मान भारत योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनाद्वारे ग्रामीण ग्रामीण रुग्णालय कंधार येथे दि. १८ एप्रिल रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटक आ.श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख अतिथी जिल्हा शल्य चिकित्सक निळकंठ भोसिकर,सौ.आशाताई शिंदे उपस्थित होत्या.कंधार ग्रामीण रुग्णालयाच्या वतिने प्रथमच एवढे भव्य महाअरोग्य शिबिर घेण्यात आले असल्याने शिबिराला कंधार तालुक्यातील रुग्णानी भरभरून प्रतिसाद दिली.या आरोग्य शिबिरात बालरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ कान-नाक-घसा तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, दंत शल्यचिकित्सक तज्ज्ञ या सह अनेक आजाराचे तज्ज्ञ डॉक्टर्स आले असल्याने सकाळपासुनच नागरिकांनी तपासणीसाठी गर्दी केली होती. तपासणीसाठी सात वेगवेगळे कक्ष तयार करण्यात आले होते. या शिबिरात २२५७ रुग्णानी विविध आजाराच्या तपासण्या करुन घेतल्या.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या