26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeमहाराष्ट्रघरावर डकविली फरारची नोटीस

घरावर डकविली फरारची नोटीस

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्यात आले आहे. तसा न्यायालयाचा आदेश त्यांच्या जुहू येथील घराबाहेर चिकटवण्यात आला आहे.

व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्याच्या कथित गुन्ह्यात आरोप म्हणून परमबीर सिंग यांना मुंबईतील अतिरिक्त मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने फरार घोषित केले आहे. परमबीर यांच्याबरोबरच आरोपी निलंबित पोलिस अधिकारी रियाज भाटी व विनय सिंह उर्फ बबलू यांनाही न्यायालयाने फरार घोषित केले आहे. परमबीर सिंग ३० दिवसांत न्यायालयात हजर न झाल्यास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अर्जाप्रमाणे व न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे त्यांची संपत्ती जप्त होण्याची कायदेशीर कारवाई सुरू होऊ शकते.

दरम्यान, परमबीर सिंग यांच्याविरोधातील कारवाईला आता धार आली आहे. परमबीर सिंग यांना फरार घोषित करणारा न्यायालयाचा आदेश त्यांच्या जुहू येथील फ्लॅटबाहेर चिकटवण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी परमबीर सिंग यांना ३० दिवसांत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

परमबीर यांच्यासह बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे, रियाज भाटी व विनय सिंह यांनी गोरेगावमधील हॉटेल व्यावसायिक बिमल अग्रवाल यांना त्यांचे बोहो रेस्टॉरंट आणि बीसीबी रेस्टॉरंट अँड बार हे निर्विघ्नपणे सुरू राहायचे असल्यास खंडणी द्यावी लागेल, असे धमकावले. तसेच त्यांच्याकडून ९ लाख रुपयांची खंडणी वसूल करण्यासह २ लाख ९२ हजार रुपये मूल्याचे दोन स्मार्टफोनही उकळले, असा आरोप परमबीर सिंग यांच्यावर आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या