25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रघर ते कार्यालय, कार्यालय ते घरापर्यंत दौरा

घर ते कार्यालय, कार्यालय ते घरापर्यंत दौरा

एकमत ऑनलाईन

 नीलम गो-हे यांनी तानाजी सावंतांना डिवचले
पुणे : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर राज्याचे नवे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या एका दौ-याची जोरदार चर्चा सुरू आहे. या तानाजी सावंत यांच्या दौ-याचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर त्यांची प्रचंड खिल्ली उडवण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यांनी तानाजी सावंत यांना डिवचले आहे. त्या पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी त्यांना आदित्य ठाकरे यांच्या पुणे दौ-याविषयी विचारणा करण्यात आली. यावर नीलम गो-हे यांनी तानाजी सावंत यांचे नाव न घेता टोला लगावला. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचा दौरा हा काही गुप्त नसेल.

तसेच हा दौरा घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर इतक्यापुरताच मर्यादित नसेल, अशी खोचक टिप्पणी गो-हे यांनी केली. त्यामुळे आता यावर तानाजी सावंत काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

अलीकडेच तानाजी सावंत यांच्या पुण्यातील दौ-याचा कार्यक्रम जिल्हा माहिती कार्यालयाकडून जाहीर करण्यात आला होता. मात्र, या दौ-याचा तपशील पाहून अनेकांना हसू फुटले होते. दौ-यानुसार शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता ते आपल्या कात्रजच्या निवासस्थानी पोहोचणार होते. त्यानंतर शनिवारी सकाळी ११ वाजता ते कात्रज निवासस्थानाहून निघून बालाजी नगर येथील कार्यालयात दुपारी ३ वाजेपर्यंत उपस्थित राहतील. तर ३ ते ५ या वेळेत बालाजी नगर येथील कार्यालयातून निघून कात्रज येथील कार्यालयात जातील. ५ ते ८ या वेळेत पुन्हा कात्रज कार्यालय ते बालाजी नगर कार्यालयात जातील. रात्री ८ वाजता बालाजी नगर कार्यालयातून निघून आपल्या कात्रज येथील निवासस्थानी जातील, असा एकंदरीत चमत्कारिक दौरा पाहून सोशल मीडियावर चर्चा रंगली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या