24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रचंद्रपूर येथे चौघांचा अपघाती मृत्यू

चंद्रपूर येथे चौघांचा अपघाती मृत्यू

एकमत ऑनलाईन

चंद्रपूर : आपल्या व्यवसायासाठी डिजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी गेलेल्या डिजे वादक पंकज बागडे यांचा दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील किसाननगर येथे बोलेरो ची उभ्या ट्रक ला धडक दिली. धडक इतकी भिषण होती की अपघातानंतर ४ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १ जण गंभीर जखमी आहे. गडचिरोली येथील प्रसिद्ध डिजे वादक पंकज बागडे यांचा दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.

गडचिरोली येथील डिजे संघटनेचे पंकज बागडे हे अध्यक्ष होते. डिजे व्यवसायासाठी काही साहित्य खरेदी करण्यासाठी काल ते सहका-यांसोबत ते चंद्रपुरात आले होते. खरेदीनंतर रात्री परत जातांना सावली तालुक्यातील किसाननगर येथे रस्त्यावर बसलेल्या गाईला वाचविताना रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रक जोरदार धडक दिली.

या धडकेत चौघांचा मृत्यू झाला. मृतकांमध्ये पंकज बागडे (वय २६ रा. गडचिरोली), अनुप ताडूलवार (वय 35 वर्ष रा.विहीरगाव ता.सावली) महेश्वरी ताडूलवार (वय २४ वर्ष रा. विहीरगाव) आणि मनोज तीर्थगिरीवार (वय २९ रा.ताडगाव ता.भामरागड जि. गडचिरोली) यांचा समावेश तर सुरेंद्र मसराम (वय 23 वर्ष रा. चिखली ता. सावली) गंभीर जखमी आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या