29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeआंतरराष्ट्रीयचंद्रावर पाणी असल्याचा मिळाला पहिला पुरावा

चंद्रावर पाणी असल्याचा मिळाला पहिला पुरावा

एकमत ऑनलाईन

बीजिंग : पृथ्वी सोडून इतर कोणत्या ठिकाणी पाणी आहे का? याबाबतचे कुतुहल सातत्याने व्यक्त केले जाते. इतर ठिकाणी पाणी असेल तर त्या ठिकाणी जीवसृष्टी असण्याचीही शक्यता व्यक्त केली जाते. मात्र, आता पृथ्वी सोडून इतर ठिकाणी पाणी आहे का, याचा शोध संपुष्टात आला आहे. चीनच्या ‘चँग ५’ या या चंद्रावर उतरलेल्या लँडरला चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी असल्याचा पहिला थेट पुरावा सापडला आहे. यामुळे चंद्राबाबतच्या संशोधनाला बळ मिळाले आहे.
याबाबतचा अभ्यास ‘सायन्स’ या नियतकालिकात दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाला आहे.

यानुसार, चंद्रावर चीनचे ‘चँग ५’ हे लँडर ज्या ठिकाणी उतरले, त्या ठिकाणच्या मातीच्या नमुन्यात पाण्याचा अंश आढळला असल्याचे ‘सायन्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे. यानुसार, या मातीमध्ये प्रतिटन १२० ग्रॅम पाणी आढळले. पृथ्वीच्या तुलनेत हे प्रमाण अत्यंत कमी आहे. खडकांच्या नमुन्यांतही पाण्याचा अंश आढळून आला आहे. सौर वा-यांमुळे चंद्रावर आर्द्रता वाढते, असे संशोधकांनी म्हटले आहे.

पहिलीच घटना
चीनचे चँग-५ हे अवकाशयान चंद्रावरील सर्वांत कमी आयुर्मान असलेल्या एका बेसाल्ट खडकावर उतरविण्यात आले आहे. या यानाने १,७३१ ग्रॅम वजनाचे मातीचे नमुने पृथ्वीवर पाठवले आहेत. यान ज्याठिकाणी उतरले त्याच ठिकाणी पाण्याचे पुरावे सापडण्याची ही पहिलीच घटना आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या