22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeचक्क... एकदाच बनवले ८ महिन्याचे जेवण!

चक्क… एकदाच बनवले ८ महिन्याचे जेवण!

एकमत ऑनलाईन

सुपर आर्गनाईज्ड मॉम केल्सीची करामत

सिडनी : एकीकडे, सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण नेमके काय करायचे याबाबत अनेक कुटूंबात नियोजन नसते. त्यातच वाढत्या महागाईने घरोघरी बचत करण्यावर भर दिला जात आहे. अशातच ऑस्ट्रेलियातील सुपर आर्गनाईज्ड मॉम केल्सी शॉ देखील यास अपवाद नव्हती, मात्र तीने पर्याय शोधला अन् संपूर्ण कुटुंबासाठी आठ महिने पुरेल एवढे अन्न (खाद्यपदार्थ) एकदाच बनवून ठेवले. सध्या जगभर याचीच चर्चा आहे. तिने शेअर केलेल्या बचतीच्या आयडियाजबद्धल अनेक जण कौतुक करीत आहेत.

३० वर्षांच्या केल्सी शॉ या महिलेस दररोजच्या ‘रांधा.. वाढा..’ कार्यक्रम कंटाळावाणा वाटायचा म्हणून तीने संपूर्ण कुटुंबासाठी पुढच्या आठ महिन्यांचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण तयार करून ते स्टोअर केले आहे. जेव्हा-जेव्हा त्यांना भूक लागते, तेव्हा सारे जण हेच अन्न गरम करून खातात. हे वाचून आश्चर्य वाटले असेल पण हे खरेच आहे.

केल्सी शॉ हिच्या घरातली पँट्री घरी लागवड केलेल्या भाज्यांनीच भरली आहे. याशिवाय या पँट्रीत शिजवलेले अन्न, औषधी वनस्पती, तांदूळ आणि पास्तादेखील स्टोअर करून ठेवण्यात आला आहे. या सुपर ऑर्गनाइज्ड आईने तिच्या पँट्रीमध्ये स्टोअर केलेले हे अन्न तिच्यासोबत तिचे कुटुंब पुढचे आठ महिने खाणार आहे. तीन मुलांची आई असणा-या केल्सीने असे का केले, याचे कारणही खूप हटके आहे. ते म्हणजे बचत करणे.

केल्सीचे जीवन अगदी शिस्तबद्ध आहे, ती प्रत्येक पदार्थ स्टोअर करते. अन्न स्टोअर करण्याचे प्रत्येक टेक्निक माहिती आहे. अन्न स्टोअर करण्यासाठी केल्सीला तीन महिने लागतात. तिचे कुटुंब उन्हाळ्यात घरातच पिकवलेल्या फळभाज्या खाते, पण हिवाळ्यासाठी त्या स्टोअर करून ठेवल्या जातात. केल्सीने अन्न स्टोअर करण्यास सुरुवात केली, जेणेकरून तिचे कुटुंब वर्षभर फक्त घरगुती अन्नच खाऊ शकेल.

सर्व भाज्या घरीच लावण्याचे दोन फायदे आहेत. एक म्हणजे, कुटुंबाला ताजे अन्न मिळते. दुसरे म्हणजे पैसेही वाचतात. केल्सीच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही प्रकारची आकस्मिक आपत्ती आल्यास काही काळ तरी अन्नाची ददात भासत नाही. ती दररोज सुमारे दोन तास बागेतील वनस्पती आणि त्यांच्या देखरेखेसाठी घालवते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या