27.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeमहाराष्ट्रचांदीवाल आयोगसमोर हजर, सचिन वाझे-परमबीर सिंग यांच्यात संवाद

चांदीवाल आयोगसमोर हजर, सचिन वाझे-परमबीर सिंग यांच्यात संवाद

एकमत ऑनलाईन

मुंबई : चांदीवाल आयोगासमोर हजर होण्यापूर्वी परमबीर सिंग आणि सचिन वाझे आमनेसामने आले आणि त्यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. या चर्चेवर माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला. दरम्यान, या भेटीची मुंबई पोलिसांनी दखल घेतली असून मुंबई पोलिस या भेटीची चौकशी करणार आहेत. परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांची भेट कोणी घडवली, भेटीसाठी अधिकृत परवानगी होती का? याची चौकशी आता मुंबई पोलिस करणार आहेत. तसेच वाझेला चांदीवाल आयोगासमोर ज्या पथकाने हजर केले, त्या पथकाचीही चौकशी करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.

परमबीर सिंग आज चांदीवाल आयोगासमोर हजर झाले. त्यावेळी सचिन वाझेलाही हजर केले. तेथे दोघांमध्ये बराचवेळ चर्चा झाली. मात्र ही चर्चा काय होती, हे गुलदस्त्यात आहे. त्यांच्या या चर्चेवर अनिल देशमुख यांच्या वकिलांनी हरकत घेतली. त्यानंतर वाझेला आयोगाने कोर्टात बसण्याचा आदेश दिला. मी सगळ््यांवर नजर ठेवू शकत नाही, तुमच्याबद्दल हरकत घेतली आहे, असे आयोगाने म्हटले.

परमबीर सिंग यांच्या विरुद्धचे वॉरंट रद्द
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग मुंबईत दाखल झाल्यानंतर घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. परमबीर सिंग आज चांदीवाल आयोगासमोर हजर झाले. यावेळी परमबीर यांच्याविरुद्ध चांदीवाल आयोगाने काढलेले वॉरंट रद्द केले आणि त्यांना एका आठवड्यात मुख्यमंत्री कोरोना सहाय्यता निधीत १५ हजार रुपये भरण्याचे आदेश दिले.

आयोगाला सांगण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही
परमबीर सिंग यांनी आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर केले. मला जे पुरावे द्यायचे आहेत, ते पुरावे दिले, आता माझ्याकडे या आयोगाला सांगण्याकरिता काही नाही. मला काहीही पुरावे द्यायचे नाहीत आणि मला कोणाचीही उलट तपासणी करायची नाही. असे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले. तसेच सिंग यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे आयोगासमोर हजर न राहण्याची मुभा द्यावी, अशी मागणीदेखील परमबीर सिंग यांनी केली.

 

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या