26.9 C
Latur
Monday, July 4, 2022
Homeराष्ट्रीयझिका व्हायरस उद्रेकाच्या उंबरठ्यावर

झिका व्हायरस उद्रेकाच्या उंबरठ्यावर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : एकीकडे कोरानाच्या नव नव्या व्हेरिएंटमुळे जगाची चिंता वाढलेले असताना आता झिका विषाणू अधिक संसर्गजन्य होण्यासाठी उत्परिवर्तन होऊ शकतो अशी भीती यूएस संशोधकांनी व्यक्त केली आहे. संशोधकांचा हा शोध जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) या महिन्याच्या सुरुवातीला जारी केलेल्या इशा-याशी सुसंगत आहे. कोरोनानंतरची पुढील महामारी झिका आणि डेंग्यूसह कीटक-जनित रोगजनकांमुळे होऊ शकते, असा इशारादेखील जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. त्यामुळे जगाची चिंता काही अंशी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, यूएस मधील ला जोला इन्स्टिट्यूट फॉर इम्युनोलॉजीच्या संशोधकांनी झिकाचे नवीन एनएस२बी आय३९व्ही/आय३९टी नवीन उत्परिवर्तन ओळखले असल्याचे म्हटले आहे.

यूएसमधील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात उंदीर आणि डास या दोघांमध्येही झिका विषाणूची प्रतिकृती बनवण्याची क्षमता वाढवल्याचे आढळून आले आहे. एवढेच नव्हे तर, या झिका प्रकाराची मानवी पेशींमध्ये वाढलेली प्रतिकृतीदेखील आढळली आहे. त्यामुळे संपूर्ण जगाने या झिका विषाणू प्रकाराच्या उदयावर लक्ष ठेवले पाहिजे असे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. २०१६ मध्ये डासांद्वारे होत असलेल्या झिका विषाणूमुळे जागतिक वैद्यकीय आणीबाणी निर्माण झाली. यामुळे हजारो बाळांना त्यांच्या मातांना गरोदर असताना संसर्ग झाल्यामुळे मायक्रोसेफली सारख्या जन्मजात दोषांसह बाळांचा जन्म झाला. संशोधनात झिका विषाणूसाठी एकल अमीनो अ‍ॅसिड बदल घेणे तुलनेने सोपे आहे. ज्यामुळे विषाणू स्वत:च्या अधिक प्रत बनवू शकतो आणि संक्रमण अधिक सहजपणे होण्यास मदत करतो असे आढळून आले असून, हे एकच उत्परिवर्तन झिका विषाणू वाढवण्यासाठी पुरेसे आहे. असे मत मेक्सिकोमधील ग्वाडालजारा विद्यापीठातील प्राध्यापक जोस एंजल रेग्ला-नावा यांनी व्यक्त केले आहे.

८९ देशांमध्ये झिका आढळला
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, डेंग्यू ताप दरवर्षी १३० देशांमध्ये ३९० दशलक्ष लोकांना संक्रमित करतो. मात्र, झिका व्हायरस किमान ८९ देशांमध्ये आढळून आला आहे. खरं तर, झिका विषाणू इतके समान आहेत की डेंग्यूच्या आधीच्या संसर्गामुळे निर्माण झालेली रोगप्रतिकारक शक्ती झिकापासून संरक्षण देऊ शकते.

भविष्यात अनेक समस्या उभ्या राहणार
आता नव्याने ओळखलेल्­या झिका प्रकाराचा विकास डेंग्यूच्­या संसर्गाच्­या आधीच्या संसर्गामुळे मिळणारी क्रॉस-संरक्षणात्मक प्रतिकारशक्ती परिणामकारक राहिलेली नसल्याचे उंदरांवर करण्यात आलेल्या अभ्यासादरम्यान समोर आली आहे. त्यामुळे जर हा विषाणू अशाच पद्धतीने बदलत राहिल्यास वास्तविक जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या