26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeमहाराष्ट्रचित्रा वाघ यांच्यावर १० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार !

चित्रा वाघ यांच्यावर १० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार !

एकमत ऑनलाईन

पुणे : भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा या माझी बदनामी करत आहेत. ज्या प्रकरणाविषयी त्या बोलत आहेत, त्यात मला अटकपूर्व जामीन मंजूर आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना माझ्यावर आरोप करून चित्रा वाघ या माझी बदनामी करत आहेत. यामुळे त्यांच्यावर मी १० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करत असून, तशी नोटीस मी दिली असल्याचे शिवसेना कामगार नेते रघुनाथ कुचिक यांनी सांगितले. अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांच्यामार्फत ११ एप्रिल रोजी त्यांनी नोटीस पाठविली.

गुन्हा दाखल झाल्यावर चित्रा वाघ यांनी रघुनाथ कुचिक यांच्यावर हल्लाबोल केला होता. कुचिक यांना जामीन देण्यावरही त्यांनी सवाल उठवला होता. याबाबत पुण्यात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन कुचिक यांच्यावर आरोप केले होते. कुचिक व संबंधित तरुणीमधील दूरध्वनीवरील संवाद त्यांनी पुढे आणत राज्य सरकारवर आरोप केले होते.

याबाबत कुचिक यांचे वकील अ‍ॅड. हर्षद निंबाळकर म्हणाले, ‘चित्रा वाघ यांच्या आरोपामुळे कुचिक यांची बदनामी झाली आहे. यामुळे चित्रा वाघ यांच्यावर आम्ही अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहोत. जवळपास १० कोटींचा हा दावा आहे.’ दरम्यान, चित्रा वाघ यांनीही ही नोटीस मिळाल्याचे ट्वीट करून सांगितले आहे. मला या प्रकरणात कसे अडकवले जाईल, अशी खलबते राज्य सरकार करत आहे, असा आरोप त्यांनी केला.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या