27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयडॉ. आंबेडकरांच्या स्मारकास आता २०२४ पर्यंत मुदतवाढ

डॉ. आंबेडकरांच्या स्मारकास आता २०२४ पर्यंत मुदतवाढ

एकमत ऑनलाईन

मुंबई : दादर येथील इंदू मिलमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामास मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. स्मारकाच्या कामास कोरोना साथीचा मोठा फटका बसला. पुतळ््याच्या चबुत-याचे काम अवघे ६ टक्के झाले आहे. बाबासाहेबांचा चीनमध्ये बनवण्यात येणारा पुतळा दोन्ही देशांतील संबंध बिघडल्यामुळे आता भारतात दिल्ली येथे बनवण्यात येणार आहे.

कंत्राटदाराला २०९ कोटी रुपये दिले असून इमारतींचे काम ४९ टक्के, तर चबुत-याचे काम ६ टक्के पूर्ण झाले आहे. स्मारकाच्या मूळ संकल्पनेनुसार अपेक्षित खर्च ७६३ कोटी आहे. सुधारित संकल्पनेनुसार १ हजार ८९ कोटी ९५ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. आतापर्यंत प्रकल्पातील एकूण २०९ कोटी ५३ लाख रुपये २३ नोव्हेंबर २०२१ रोजी अदा करण्यात आले आहेत. यात आगाऊ रक्कम म्हणून ३१ कोटी ६५ लाख रुपये व प्रकल्प सल्लागाराच्या शुल्कापोटी १२ कोटी ६८ कोटी रुपयांचा समावेश आहे. या प्रकल्पाचे कंत्राटदार मेसर्स शापूरजी पालनजी तर प्रकल्प सल्लागार शशी प्रभू असोसिएट्स आहेत.

आंबेडकरी जनतेत नाराजी
स्मारकाच्या कामाचा ९ फेब्रुवारी २०१८ रोजी कार्यादेश जारी करण्यात आला असून ३६ महिन्यांत म्हणजे फेब्रुवारी २१ मध्ये काम पूर्ण होणे अपेक्षित होते. प्रकल्पाचे काम १४ महिन्यांपूर्वी पूर्ण होणे अपेक्षित असताना कंत्राटदार व स्मारकाचे प्राधिकरण असलेल्या एमएमआरडीएमुळे कामास मोठा उशीर होत असल्याबाबत आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या