29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeआंतरराष्ट्रीयचीनच्या कृत्रिम सूर्यामुळे जगभरात चिंता

चीनच्या कृत्रिम सूर्यामुळे जगभरात चिंता

एकमत ऑनलाईन

बीजिंग : चीनच्या कृत्रिम सूर्याने पुन्हा एकदा एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला असून, हेफेई स्थित न्यूक्लिअर फ्यूजन रिअ‍ॅक्टरमधून १,०५६ सेकंद किंवा जवळपास १७ मिनिटांपर्यंत ७० कोटी अंश सेल्सिअस ऊर्जा उत्सर्जित करण्यात आली. दरम्यान, चीनच्या या बनावट सूर्यातून बाहेर पडणा-या अफाट ऊर्जेमुळे जगाची चिंता मात्र वाढली आहे.
चीनच्या या कृत्रिम सूर्याने गेल्या ३० डिसेंबर रोजी एका विक्रमाची नोंद केली होती.

एखाद्या अणुभट्टीतून एवढ्या मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी याच कृत्रिम सूर्यातून १.२ कोटी अंश ऊर्जा उत्सर्जित झाली होती. हेफेई इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल सायन्सेसकडून एक्सपेरिमेन्टल अ‍ॅडव्हान्स्ड सुपरकंडक्टिंग टोकामाक हा हीटिंग सिस्टम प्रोजेक्ट सुरू केला आहे. इथे हायड्रोजनच्या साहाय्याने हेलियम तयार करण्यात येतो. या दरम्यान मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. शुक्रवारी, चायना अकादमी ऑफ सायन्सेसचे संशोधक गोंग शियान्जू यांनी ७ कोटी अंश सेल्सिअसपर्यंत ऊर्जा निर्मितीची घोषणा केली. गोंग यांच्याच मार्गदर्शनाखाली हेफेईमध्ये हा प्रयोग सुरू आहे.

तापमान ७ कोटी अंशावर
आम्ही २०२१ च्या पहिल्या सहा महिन्यांत १०१ सेकंद १.२ कोटी अंश सेल्सिअस तापमान गाठले होते. यावेळेस हे प्लाझ्मा ऑपरेशन जवळपास १,०५६ सेकंद सुरू होते. या दरम्यान तापमान ७ कोटी अंश सेल्सिअसच्या आसपास राहिले. यामुळे फ्यूजनवर आधारित अणुभट्टी चालविण्यासाठी एक ठोस वैज्ञानिक आणि प्रायोगिक आधार निर्माण झाला आहे, असे गोंग यांनी चीनच्या अधिकृत संवाद समिती शिन्हुआसोबत झालेल्या संभाषणादरम्यान म्हटले आहे.

मानवाला असीमित ऊर्जा मिळणार
मानवाला असीमित ऊर्जा मिळावी, यासाठी जगभरातील काही प्रगत देशांत अशाच प्रकारचे तंत्रज्ञान शोधून काढण्यासाठी संघर्ष सुरू आहे. चीनच्या या यशस्वी प्रयोगामुळे अमेरिका आणि ब्रिटन यांसारख्या देशांनाही अशाच प्रकारच्या संशोधनासाठी सज्ज व्हावे लागले आहे.

१७ मिनिटांत नोंदविला विक्रम
चीनच्या हेफेई स्थित कृत्रिम सूर्याने गेल्या ३० डिसेंबर रोजी एका विक्रमाची नोंद केली होती. आता याच न्यूक्लिअर फ्यूजन रिअ‍ॅक्टर’मधून १,०५६ सेकंद किंवा जवळपास १७ मिनिटांपर्यंत ७० कोटी अंश सेल्सिअस ऊर्जा उत्सर्जित करण्यात आली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या