22.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeक्रीडाचुरशीच्या लढतीत हैदराबाद विजयी

चुरशीच्या लढतीत हैदराबाद विजयी

एकमत ऑनलाईन

मुंबई : हैदराबादच्या संघाने मुंबई इंडियन्सवर तीन धावांनी विजय साकारला आणि त्यांनी आयपीएलमधील आव्हान जीवंत ठेवले आहे. या विजयानंतर हैदराबादचे १२ गुण झाले आहेत. सध्याच्या घडीला गुणतालिकेत कोलकाता आणि पंजाब या दोन्ही संघांचे समान १२ गुण आहेत. त्याचबरोबर राजस्थान आणि लखनौ या दोन्ही संघाचे समान १६ गुण आहेत, तर दिल्ली आणि आरसीबी यांच्या खात्यात प्रत्येकी १४ गुण आहेत. त्यामुळे हैदराबादला जर प्ले ऑफमध्ये पोहोचायचे असेल तर त्यांना अखेरच्या सामन्यात मोठा विजय मिळवावा लागेल. त्याचबरोबर दिल्ली आणि आरसीबीचा संघ पराभूत झाल्यावर हैदराबादचा प्ले ऑफची जास्त संधी असू शकेल.

त्याचबरोबर कोलकाता आणि पंजाबच्या पराभवाचेही साकडे त्यांना घालावे लागेल. त्यामुळे हैदराबादचा प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग म्हणावा तेवढा सोपा नक्कीच नाही. हैदराबादच्या १९४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी झंझावात सुरुवात करून दिली. रोहित या सामन्यात मोठी खेळी साकारेल, असे वाटत होते. पण यावेळी त्याचे अर्धशतक फक्त दोन धावांनी हुकले. रोहितने ३६ चेंडूंत २ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ४८ धावा केल्या. रोहित शर्माच्यापाठोपाठ इशान किशनही बाद झाला आणि मुंबईच्या संघाला दुसरा धक्का बसला.
इशानला यावेळी ४३ धावा करता आल्या. त्यामुळे एकेकाळी बिनबाद ९५ अशी मजल मारणा-या मुंबईची २ बाद १०१ अशी स्थिती झाली. तिलक वर्माही यावेळी आठ धावांवर बाद झाला आणि मुंबईचा संघ पराभूत होणार का, असे वाटायला लागले. तत्पूर्वी हैदराबादच्या संघाने यावेळी प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी धडाकेबाज फलंदाजीचा नमुना पेश केला. अभिषेक वर्मा बाद झाल्यावर राहुल त्रिपाठी फलंदाजीला आला आणि त्यानंतर हैदराबादची धाववगती वाढायला लागली. प्रियम गर्ग आणि राहुल यांनी दुस-या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी रचली.

प्रियम गर्गने यावेळी ४२ धावांची खेळी साकारत राहुलला चांगली साथ दिली. त्यानंतर राहुलने निकोलस पुरनच्या साथीने पुन्हा एकदा मुंबईच्या गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवला. निकोलस आणि राहुल यांच्यामध्ये तिस-या विकेटसाठी पुन्हा एकदा ७८ धावांची भागीदारी पाहायला मिळाली. पुरनने यावेळी २२ चेंडूंत ३८ धावांची खेळी साकारत धावगती चांगलीच वाढवली. हैदराबादसाठी यावेळी हुकमी एक्का ठरला तो राहुल. कारण राहुलने यावेळी ४४ चेंडूत ९ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ७६ धावांची खेळी साकारली आणि हैदराबादला मोठ्या धावसंख्येकडे तो घेऊन गेला. त्यामुळेच हैदराबादच्या संघाला मुंबईपुढे १९४ धावांचे आव्हान ठेवता आले.

 

 

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या