29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeराष्ट्रीयजगभरातील ७५ लाख लोकांनी घातला सूर्यनमस्कार

जगभरातील ७५ लाख लोकांनी घातला सूर्यनमस्कार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : मकर संक्रांतीनिमित्त आयुष मंत्रालयाने आज आसाममध्ये जागतिक सूर्यनमस्कार प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये ७५ लाखांहून अधिक लोकांनी सहभाग नोंदविला. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत आयोजित कार्यक्रमात आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी स्वत: सूर्यनमस्कार घातले. डीडी नॅशनलवर सकाळी ७ ते ७.३० या वेळेत सूर्यनमस्काराचे १३ वेळा थेट प्रक्षेपण करण्यात आले. या कार्यक्रमात देश-विदेशातील योगशिक्षक आणि योगगुरूही सहभागी झाले होते.

आयुष मंत्री सोनोवाल म्हणाले, सूर्य नमस्कारामुळे चैतन्य आणि प्रतिकारशक्ती निर्माण होते. त्यामुळे कोरोना विषाणूला दूर ठेवण्यास मदत होते हे सिद्ध झाले आहे. या कार्यक्रमात ७५ लाख लोक सहभागी होण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. वास्तविक यात एक कोटीहून अधिक लोकांनी सहभाग घेतल्याचे सांगण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करत आहे. देशातील आणि जगभरातील ७५ लाखांहून अधिक लोकांनी यामध्ये सहभाग नोंदविला आहे. यासाठी आयुष मंत्रालय, केंद्रीय मंत्रालय, देश-विदेशातील योग संस्था आणि लोकांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला. मानव समाजाच्या कल्याणासाठी प्रत्येक व्यक्तीने यात सहभाग घेतला असल्याचे ते म्हणाले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या