श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक सुरू झाली. किलबाल भागात सुरू असलेल्या या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांना घेरले. गुरुवारीच सुरक्षा दलांनी बडगाम जिल्ह्यातून लष्कर-ए-तोयबाच्या एका दहशतवाद्याला अटक केली.
नुकतेच इंटेलिजन्स ब्युरोने प्रजासत्ताक दिनापूर्वी मोठ्या दहशतवादी कारवायांबाबत अलर्ट जारी केला होता. मीडिया रिपोटर््सनुसार लष्कर आणि अल-बद्र काश्मीरमध्ये दहशतवादी घटनांची योजना आखत असल्याचे सांगण्यात आले. तेव्हापासून परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर अलर्ट जारी केला.