27.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeमहाराष्ट्रजहाल नक्षलवाद्याला गडचिरोलीत अटक

जहाल नक्षलवाद्याला गडचिरोलीत अटक

एकमत ऑनलाईन

गडचिरोली : पोलिस उपविभाग हेडरी अंतर्गत येणा-या पोमके गट्टा (जां.) हद्दीत दि. १४ जानेवारी रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गट्टा (जां.) जंगल परिसरात विशेष अभियान पथक गडचिरोली, पोस्टे पार्टी गट्टा (जां.) व सीआरपीएफ १९१ बटालियनच्या ई कंपनीचे जवान नक्षल विरोधी अभियान राबवित असताना जहाल नक्षली करण ऊर्फ दुलसा पेका नरोटे यास अटक करण्यात आली.

नक्षलीदृष्टया अतिसंवेदनशील मौजा गोरगुट्टा येथील रहिवासी असलेला करण ऊर्फ दुलसा पेका नरोटे (३०) पोमके गट्टा (जांबिया) ता. एटापल्ली जि. गडचिरोली हा प्लाटून क्र.१४ च्या सशस्त्र दलम सदस्य पदावर कार्यरत होता. तसेच तो गट्टा दलम सदस्य व नक्षलच्या अक्शन टीमचा सदस्य होता. सन २००८ रोजी पोस्टे भामरागड हद्दीत झालेल्या दोबूर जंगल परिसर चकमक व राजू धुर्वा याच्या खुनात त्याचा सहभाग होता. उपपोस्टे दामरंचा हद्दीतील मौजा कोरेपल्ली चकमक तसेच सन २०१० रोजी मिरकल फाटा चकमकीत व तोंडेर येथील रहिवासी चुक्कू याच्या खुनात त्याचा सक्रीय सहभाग होता. विविध गुन्ह्यात त्याचा हात असल्याने नक्षलविरोधी अभियानात मोठे यश प्राप्त झाले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या