23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeआंतरराष्ट्रीयजागतिक बँकेने घटविला भारताचा विकासदर

जागतिक बँकेने घटविला भारताचा विकासदर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जागतिक बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या आर्थिक विकासाचा अंदाज ७.५ टक्क्यांवर आणला आहे. यापूर्वी २०२२-२३ मध्ये भारताचा आर्थिक विकास दर ८.७ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता.

वाढत्या महागाईचा दबाव, पुरवठा साखळीतील अडथळे आणि भू-राजकीय तणावामुळे निर्माण होणारी आव्हाने लक्षात घेऊन भारताच्या विकास दराचा अंदाज वर्तवला आहे, असे जागतिक बँकेने मंगळवारी ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्सच्या आर्थिक संभावनांवरील आपल्या अहवालात म्हटले आहे.

२०२३-२४ या आर्थिक वर्षातही भारताचा विकास दर ७.१ टक्के राहील, असा जागतिक बँकेचा अंदाज आहे. हे मागील अंदाजापेक्षा ०.३० टक्के जास्त आहे. मागील अंदाज ६.८ टक्के होता. अहवालात अंदाज आहे की २०२४-२५ या वर्षात भारताचा जीडीपी ६.५ टक्के असू शकतो. जागतिक बँकेने २०२२ साठी जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाज ४.१ टक्क्यांवरून २.९ टक्क्यांवर आणला आहे.

जागतिक बँकेने आपल्या अहवालात म्हटले आहे की, जागतिक वाढ २०२१ मध्ये ५.७ टक्क्यांवरून २०२२ मध्ये २.९ टक्क्यांवर येऊ शकते. या जागतिक वित्तीय संघटनेने जानेवारीमध्ये २०२२ च्या जागतिक आर्थिक वाढीचा अंदाज ४.१ टक्के वर्तवला होता.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या