29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeआंतरराष्ट्रीयजैश-ए-मोहम्मदकडून संघ मुख्यालयाची रेकी

जैश-ए-मोहम्मदकडून संघ मुख्यालयाची रेकी

एकमत ऑनलाईन

नागपूर : नागपुरातील काही संवेदनशील ठिकाणांची पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदकडून रेकी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनीही या वृत्तास दुजोरा दिला आहे.

सेंट्रल एजन्सीकडून पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाल परिसरातील मुख्यालय, रेशीम बागमधील संघाचा डॉ.हेडगेवार स्मृती मंदिर परिसर आणि इतर काही संवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन तिथे सुरक्षा व्यवस्था मजबूत केली आहे. पोलिस आयुक्तांनी नागपुरातील कोणत्या ठिकाणांची रेकी करण्यात आली, याची माहिती दिली नाही. मात्र, या प्रकरणी यूएपीए कायद्याअंतर्गत एक गुन्हा दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या