22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeक्रीडाजोकोविचने पटकावले विम्बल्डनचे जेतेपद

जोकोविचने पटकावले विम्बल्डनचे जेतेपद

एकमत ऑनलाईन

२१ व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाला गवसणी
लंडन : विम्बल्डन २०२२ या टेनिस जगतातील मानाच्या स्पर्धेच्या पुरुष एकेरीतील अंतिम सामन्यात सर्बियाच्या नोवाक जोकोविचने ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसला मात देत विजेतेपद मिळवले आहे. सलग चौथ्यांदा नोवाकने विम्बल्डनचे जेतेपद पटकावले असून आता त्याच्याकडे २१ ग्रँडस्लॅम झाले आहेत. त्याने रॉजर फेडररला मागे टाकले आहे. अत्यंत चुरशीच्या सामन्यात नोवाकने ४-६, ६-३, ६-४, ७-६ (३) च्या फरकाने विजय मिळवला आहे. अटीतटीच्या सामन्यात अखेर टायब्रेकर झाल्यानंतर नोवाकने विजय मिळवत जेतेपद नावे केले आहे.

जोकोविचने मागील तीन वेळा सलग विम्बल्डन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. ज्यानंतर आता आज त्याने विजय मिळवत विम्बल्डन २०२२ च्या स्पर्धेचेही जेतेपद पटकावत सलग चौथ्यांदा विम्बल्डन स्पर्धा जिंकली. सलग चौथ्यांदा विजेतेपद पटकावणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे.

आपली पहिली ग्रँडस्लॅम अंतिम फेरी खेळत असलेल्या किर्गिओसने जोकोविचला कडवी टक्कर दिली. सुरुवातीचा सेट जिंकून निकने आघाडी घेतली होती. मात्र, त्यानंतर जोकोविचने शानदार खेळ केला. त्यानंतर चौथ्या सेटमध्ये सामना टायब्रेकरमध्ये गेला. तिथे जोकोविचने ६-१ अशी आघाडी घेतली. जोकोविचचे हे एकूण २१ वे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. आता त्याच्या पुढे फक्त राफेल नदाल आहे. नदालने आतापर्यंत २२ ग्रँडस्लॅम जिंकल्या आहेत.

नदालचे भविष्य प्रश्नांकित
१९६८ पासून ओपन एरामध्ये सर्वाधिक विम्बल्डन जिंकण्यामध्ये जोकोविच दुस-या स्थानावर पोहोचला आहे. स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर त्याच्या पुढे आहे. फेडररने आतापर्यंत ८ विम्बल्डन जिंकलेल्या आहेत. सातव्यांदा विम्बल्डन विजेता बनून जोकोविचने अमेरिकेच्या पीट सॅम्प्रासची बरोबरी केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या