नवी दिल्ली/जोशीमठ : वृत्तसंस्था : भूस्खलनाने घेरलेल्या जोशीमठ परिसरात क्षतीग्रस्त भागांमध्ये राज्य आपत्ती व्यवस्थापनाने हॉटेलचे पाडकाम सुरू केले आहे. मात्र, पथकाला स्थानिक विरोधाला सामोरे जावे लागत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेतली.
तीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आर. के.सिंह, भूपेंद्र यादव, राजेंद्र सिंह आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जोशीमठ परिसरात आतापर्यंत ७२० घरांंची भू स्खलनानने पडझड, भिंतींचे नुकसान झाले आहे.
या घडामोडीत मुख्यमंत्री पुषकमसिंह धामी यांनी गुरुवारी ४५ कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा केली. प्रभावित ३००० कुटुंबांना ही आपत्ती मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून बांधकामावर स्थगिती आणली आहे. लष्कराच्या २५-२८ इमारतींनाही तडे गेल्याचे दिसत असल्याने जवानांनाही तात्पुरत्या निवासस्थानी हलवले आहे.