नवी दिल्ली : ज्ञानवापी मशिदीच्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने कनिष्ठ कोर्टाला आज कोणताही आदेश न देण्याचे निर्देश दिले आहेत. सुप्रीम कोर्टात या प्रकरणी आज सुनावणी होणार नसून शुक्रवारी दुपारी ३ वाजता ही सुनावणी होणार आहे.हिंदुत्ववाद्यांचे वकील विष्णू जैन यांनी कोर्टाला या प्रकरणी उद्या सुनावणी करण्याची विनंती केली होती. तर, उत्तर प्रदेश सरकारचे वकील अॅड. मेहता यांनी या प्रकरणावर लवकर सुनावणी करण्याची विनंती केली होती.
तर, मुस्लिम पक्षकारांची बाजू मांडणारे ज्येष्ठ अधिवक्ते हुजेफा अहमदी यांनी देशभरात या प्रकरणी खटले दाखल केल्याने आज सुनावणी घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर न्या. चंद्रचूड यांनी खंडपीठातील इतर न्यायाधीशांसह चर्चा करून शुक्रवारी सुनावणी घेणार असल्याचे म्हटले.
हिंदुत्ववाद्यांचे वकील विष्णू जैन यांनी कोर्टाला या प्रकरणी उद्या सुनावणी करण्याची विनंती केली होती.
उत्तर प्रदेश सरकारचे वकील अॅड. मेहता यांनी या प्रकरणावर लवकर सुनावणी करण्याची विनंती केली होती. तर मुस्लिम पक्षकारांची बाजू मांडणारे ज्येष्ठ अधिवक्ते हुजेफा अहमदी यांनी देशभरात या प्रकरणी खटले दाखल केल्याने आज सुनावणी घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर न्या. चंद्रचूड यांनी खंडपीठातील इतर न्यायाधीशांसह चर्चा करून शुक्रवारी सुनावणी घेणार असल्याचे म्हटले.