18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeराष्ट्रीयज्ञानवापी प्रकरण: हिंदू पक्षाला बाजू मांडण्यासाठी ३ आठवड्यांची मुदत

ज्ञानवापी प्रकरण: हिंदू पक्षाला बाजू मांडण्यासाठी ३ आठवड्यांची मुदत

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : वाराणसीतील ज्ञानवापी परिसरात सापडलेल्या शिवलिंगानंतर उद्भवलेल्या वादावर सुनावणी देताना सुप्रीम कोर्टाने हिंदू पक्षा आपली बाजू मांडण्यासाठी ३ आठवड्यांची मुदत दिली.

पुढील सुनावणी पर्यंत हे ठिकाण सील ठेवण्याचा निर्णय कायम ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. सर्व्हे कमिशनरच्या नियुक्तीवरील अलाहाबाद हायकोर्टाच्या आदेशाला आव्हान देणा-या मुस्लिम पक्षाच्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हिंदू पक्षाला ही ३ आठवड्यांची मुदत दिली आहे.

हिंदू पक्षाच्या वकिलांनी ज्ञानव्यापी प्रकरणी संरक्षण कायम ठेवण्याची विनंती सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. सूर्यकांत आणि न्या. पी. एस. नरसिंहा यांच्या पीठाकडे केली होती. त्यावर पीठाने आदेश कायम ठेवला. ज्ञानवापीमधील ज्या ठिकाणी शिवलिंग आढळले होते ती जागा संरक्षित ठेवण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला होता.

सर्व्हेक्षणाचा निर्णयही राखीव
या प्रकरणी अलाहाबाद हायकोर्टातही सुनावणी झाली. मंदिर पक्षाकडील वकील सी. एस. वैद्यनाथन यांनी युक्तिवाद करताना कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी सर्व्हेची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. सोबतच या प्रकरणावर मशीद व्यवस्थापन समितीने दाखल केलेल्या अपिलावरील सुनावणी २८ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या