19 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeराष्ट्रीयज्येष्ठ गांधीवादी पद्मश्री इलाबेन भट्ट यांचे निधन

ज्येष्ठ गांधीवादी पद्मश्री इलाबेन भट्ट यांचे निधन

एकमत ऑनलाईन

अहमदाबाद : महिलांच्या रोजगारासाठी उल्लेखनीय योगदान देणा-या ज्येष्ठ गांधीवादी समाजसेविका पद्मभूषण, रॅमन मॅगासेसे पुरस्कार प्राप्त समाजसेविका इलाबेन भट्ट यांचे ८९ व्या वर्षी निधन झाले. गांधीवादी इलाबेन यांनी बुधवारी अहमदाबादच्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. इलाबेन यांना १९७७ मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्काराने गौरविण्यात आलेहोते. त्यानंतर १९८६ मध्ये राईट लाइव्हलीहुड अवॉर्ड आणि पद्मभूषण पुरस्काराने ही त्यांना सन्मानित करण्यात आले.

७ सप्टेंबर १९३३ मध्ये जन्मलेल्या इलाबेन यांनी १९७२मध्ये स्वाश्रय महिला सेवा संघाची (सेवा)स्थापना केली होती.
इलाबेन यांचा १९५६ मध्ये रमेश भट्ट यांच्याशी विवाह झाला होता. त्यांची दोन मुले अमिमायी आणि मिहीर अहमदाबादेत वास्तव्याला आहेत.
भारत सरकारने त्यांना १९८५ मध्ये पद्मश्री आणि १९८६मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.
भारतातील गरीब महिलांच्या सक्षमीकरणासाठी २०१० मध्ये निवा शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या