22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeराष्ट्रीयझारखंड : २ आमदारांच्या घरावर आयकरचे छापे ; २ कोटी रोख

झारखंड : २ आमदारांच्या घरावर आयकरचे छापे ; २ कोटी रोख

एकमत ऑनलाईन

रांची : खाण घोटाळा प्रकरणात इडी आणि सिबीआयच्या रडारवर आलेल्या राज्य सरकारवर आता आयकर विभागानेही मंगळवारी छापे टाकले. झारखंडमध्ये प्राप्तिकर विभागाने कॉँग्रेसच्या दोन आमदारांसह त्यांच्या निकटवर्तीयांच्या ७० ठिकाणी छापे टाकत झाडाझडती घेतली. दोन आमदारांच्या घरात आयकर विभागाला २ कोटी रुपयांची रोख आणि १०० कोटींच्या गुंतवणूक व्यवहारांची कागदपत्रे सापडली आहेत.

आयकर विभागाच्या पथकाने काँग्रेसचे आमदार जयमंगल सिंह आणि प्रदीप यादव यांच्या घरावर छापे टाकले होते. ही रोकड नेमकी कोणाकडून मिळाली, हे मात्र प्राप्तिकर विभागाने स्पष्ट केलेले नाही.

३ राज्यांत ७० ठिकाणी धाडी
प्राप्तिकर विभागाने खाण घोटाळा प्रकरणात झारखंड, बिहार आणि पश्चिम बंगाल अशा तीन राज्यांत ७० ठिकाणी छापे टाकले. या छाप्यात एकूण १६ बँक लॉकर्सची झडती घेण्यात आली असून अनेक कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहे.

कोळसा व्यापारीही रडारवर
आयकर विभागाने दोन आमदारांसह बर्मोचे कोळसा व्यापारी अजय कुमार सिंग, लकी सिंग, गोड्डा हॉटेल स्काय ब्लूचे मालक श्यामाकांत यादव, दुमका एनपीचे उपाध्यक्ष कम पीएचईडी कॉन्ट्रॅक्टर विनोद कुमार लाल, रांचीचे माजी खाण अधिकारी आनंद मोहन ठाकूर, व्यापारी शाह ब्रदर्स यांच्यावरही छापे टाकले. रांची, गोड्डा, बर्मो, दुमका, जमशेदपूर, चाईबासा, पाटणा, गुरुग्राम आणि कोलकाता अशा ७० हून अधिक परिसरांमध्ये आयकर विभागाने झाडाझडती घेतली.

लोहखनिजाचा बेहिशेबी साठा
आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात एका ग्रुपकडे प्रचंड किमतीच्या लोहखनिजाचा साठा सापडला. या कंपनीने अनेक शेल कंपन्यांच्या माध्यमातून अगणित मालमत्ता जमा करीत शेअर बाजारातही गुंतवणूक केली आहे.

आमदारांची चौकशी २१ नोव्हेंबरला
बर्मो येथील काँग्रेसचे आमदार जयमंगल सिंह उर्फ ​​अनूप सिंह यांना आयकर विभागाने चौकशीसाठी २१ नोंव्हेंबर ला कार्यालयात बोलावले आहे. आयटीच्या टीमने त्यांचा फोनही ताब्यात घेतला आहे. छाप्याच्या शेवटच्या दिवशी आयकर विभागाच्या पथकाला अनुप सिंग यांचे नातेवाईक अंकित आणि कंपनीचे संचालक वाघेश चौधरींकडून महत्त्वाची कागदपत्रे हाती लागली आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या