नवी दिल्ली : सोशल मीडियावर स्टार चेहरा असलेल्या मेघा ठाकूरच्या आकस्मिक निधनाने तिच्या लाखो फॉलोअर्सना धक्का बसला आहे. कॅनेडियन टिकटॉक स्टार मेघा ठाकूरच्या मृत्यूची माहिती तिच्या पालकांनीच दिली आहे.
ती फक्त २१ वर्षांची होती. मेघाचे सोशल मीडियावर लाखोंमध्ये फॉलोअर्स होते. मेघा आपल्या सोशल मीडियावर डान्सचे आणि मोटीव्हेशनचे व्हिडीओ शेअर करत असायची. अतिशय कमी वयात सोशल मीडियावर तिचा तगडा चाहतावर्ग तयार झाला होता. मेघाच्या वडिलांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून तिच्या निधनाची माहिती दिली.
तिच्या निधनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नसले तरी अपघाती निधन झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मेघाच्या वडिलांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहळे आहे की, ‘आमच्या आयुष्याचा प्रकाश, आमची काळजी घेणारी सुंदर मुलगी मेघा ठाकूर हिने २४ नोव्हेंबर रोजी अचानक निधन झाले आहे’ अशी पोस्ट वडिलांनी लिहिली आहे.
मेघाच्या निधनामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मेघा ही मूळची मध्यप्रदेशातील इंदूर इथली राहणारी आहे. २००१ मध्ये तिचा जन्म झाला. तर ती एक वर्षाची असताना तिचे आई-वडील कॅनडाला स्थायिक झाले होते. मेघाचे शिक्षण कॅनडामध्येच पूर्ण झाले आहे.