21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeमहाराष्ट्रटीईटी परीक्षा घोटाळ््यातील आयएएस अधिकारी पुन्हा रुजू

टीईटी परीक्षा घोटाळ््यातील आयएएस अधिकारी पुन्हा रुजू

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यभर गाजलेल्या टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणातील आरोपी असलेल्या आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांचे निलंबन राज्य सरकारने रद्द केले आहे. सुशील खोडवेकर यांना पुन्हा एकदा प्रशासकीय सेवेत रुजू करुन घेण्यात आले असून उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाच्या सदस्य सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जर या खोडवेकरांनी पैसे घेऊन टीईटीमध्ये पास केले, त्या शिक्षकांवर कारवाई करायचा निर्णय होतो, तर मग या खोडवेकरांना नियुक्ती कशी काय मिळू शकते, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

टीईटी प्रकरणात अटक असलेले परीक्षा परिषदेचे माजी अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्या संपर्कात असलेल्या सुशील खोडवेकर यांना पुणे सायबर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सुशील खोडवेकर हे २०११ चे अधिकारी तथा कृषी विभागात प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून कार्यरत होते. पूर्वी शिक्षण विभागात आस्थापनांमध्ये उपसचिव असलेल्या सुशील खोडवेकर यांनी तुकाराम सुपे यांना खात्यांतर्गत चौकशीमध्ये निर्दोष सोडले होते आणि जीए सॉफ्टवेअर या कंपनीस काळ््या यादीतून बाहेर काढण्याचा प्रताप केला. विशेष म्हणजे या बदल्यात जीए सॉफ्टवेअरच्या अभिषेक सावरीकर यांच्याकडून खोडवेकरांनी पैसे घेतले. शिवाय तुकाराम सुपे यांच्या संपर्कात राहून अनेक मुलांना टीईटीमध्ये पास केल्याचे तपासामध्ये स्पष्ट झाले होते.

तुकाराम सुपे यांना जामीन आणि निवृत्ती
टीईटी घोटाळ््यातील मुख्य आरोपी तुकाराम सुपे याला पुणे पोलिसांच्या सायबर शाखेने अटक केली होती. या प्रकरणी पेपर फुटीचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. त्या तुकाराम सुपेला ३१ मे रोजी जामीन मिळाला आणि तो त्याच दिवशी निवृत्त झाला.

त्या ७८०० जणांवर कारवाई
टीईटी परीक्षा २०१९-२० या बनावट वेबसाईटवर निकाल प्रसिद्ध करून जवळपास साडेपाचशे ते सहाशे अपात्र उमेदवारांना पात्र केल्याचा आरोप सुरुवातीला होता. मात्र पुणे सायबर पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासामध्ये तब्बल ७८०० जणांना पैसे घेऊन पास केल्याचे उघड झाले आहे. या ७८०० विद्यार्थ्यांना अपात्र ठरविण्यात येणार असून त्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्यांना भविष्यात शिक्षक पात्रता परीक्षा देण्यास मनाई करण्यात आली आहे. एकीकडे शिक्षक म्हणून नोकरी करणा-या या शिक्षकांना सेवेतून बडतर्फ करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली, तर दुसरीकडे पैसे खावून पास करणारे अधिकारी पुन्हा रुजू झाले आहेत. त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या