20.9 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeक्रीडाटीम इंडियाचे विराट सेलिब्रेशन

टीम इंडियाचे विराट सेलिब्रेशन

एकमत ऑनलाईन

मेलबर्न: टीम इंडियाची रन मशीन विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त टीम इंडियाने शनिवारी ऑस्ट्रेलियात विराट सेलिब्रेशन केले. टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौ-यावर आहे. त्यामुळे विराटने हा वाढदिवस टीम सोबत साजरा केला.

भारताचे मेंटल हेल्थ अँड कंडीशंिनग कोच पॅडी अप्टन यांचाही आज वाढदिवस आहे. त्यामळ कोहली व अप्टन यांनी एकत्रच केक कापला. विराटने भारतीय क्रीडा पत्रकारांसोबतही वाढदिवस साजरा केला. तत्पूर्वी, विराटने टीम सोबत मौज – मजा करतानाचा मूड मध्ये दिसला. कर्णधार रोहित शर्माने त्याच्या चेह-यावर केक माखला.

मैदानावर चाहत्यांचे सेलिब्रेशन
टीम इंडियाच्या केक पार्टीसह विराटच्या चाहत्यांनी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर त्याचा वाढदिवस साजरा केला.
हैदराबादेत कोहलीच्या चाहत्यांनी विराट कट आऊट लावत सेलिब्रेशन केले.

विराटचा सुपमॅन अवतार
रॉयल चॅलेन्जर बंगळुरूने विराटचा सुपरमॅन अवतार साकारत त्याचा वाढदिवस साजरा केला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या