20.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeक्रीडाटी-२० वर्ल्डकपनंतर रवी शास्त्री होणार पायउतार?

टी-२० वर्ल्डकपनंतर रवी शास्त्री होणार पायउतार?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ टी-२० विश्वचषकानंतर समाप्त होणार आहे. टी-२० विश्वचषकास ऑक्टोबरमध्ये सुरुवात होणार असून, १४ नोव्हेंबर रोजी अंतिम सामना खेळला जाणार आहे. म्हणजे पुढील दोन महिन्यांनंतर रवी शास्त्री हे भारतीय संघाचे प्रशिक्षक असणार नाहीत. तर, रवी शास्त्रींनंतर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी आता अनिल कुंबळे यांचे नाव पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आले आहे.

बीसीसीआय आता पुन्हा एकदा भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अनिल कुंबळेंना परत आणण्याच्या तयारीत आहे आणि त्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, रवी शास्त्री यांनी आपल्या कार्यकाळाबाबत एक विधान केले आहे आणि म्हटले आहे की प्रशिक्षकाच्या कार्यकाळात त्यांनी सर्व काही मिळवलं, ज्यांची ते अपेक्षा बाळगून होते. त्यांनी हे देखील सांगितले की, जर भारतीय टीमने टी-२० विश्वचषक जिंकली तर ही बाब त्यांच्या कार्यकाळात ‘सोने पे सुहागा’ ठरेल. एका मुलाखतीत शास्त्रींनी सांगितले की त्यांनी आपल्या कार्यकाळात सर्वकाही मिळवले.

शास्त्रीच्या कार्यकाळात भारताने दक्षिण आफ्रिका, न्यूझिलंड, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये टी-२० मालिकेत विजय मिळवला. शास्त्रींनी सांगितले की, आम्ही जगातील प्रत्येक देशाला पांढ-या बॉलच्या क्रिकेट सामन्यामध्ये हरवले आहे, जर आम्ही टी-२० विश्वचषक जिंकला तर हे ‘सोने पे सुहागा’ होईल. यापेक्षा जास्त काहीच नाही.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या