22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Home'डार्लिंग्स' चा ट्रेलर रिलीज

‘डार्लिंग्स’ चा ट्रेलर रिलीज

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट तिच्या अभिनयाने सध्या प्रेक्षकांची मने जिंकत आहे. काही दिवसांपूर्वी आलियाचा गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटातील आलिच्या अभिनयाचे अनेकांची कौतुक केले. आता लवकरच आलियाचा ‘डार्लिंग्स’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये आलियाने प्रमुख भूमिका साकारली आहे. ट्रेलरमध्ये दिसत आहे की आलिया ही स्वत:च्या पतीचे अपहरण करुन पोलिसांकडे तक्रार करायला जाते. ‘डार्लिंग्स’ चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

डार्लिंग्स चित्रपटामध्ये आलियाच्या पतीची भूमिका अभिनेता विजय वर्माने साकारली आहे. शेफाली शाह आणि रोशन मॅथ्यू या कलाकारांनीदेखील या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकरली आहे. आलियाने या चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. तिने या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, मी प्रोड्यूस केलेला हा पहिला सिनेमा, मी खूप उत्सुक. हा चित्रपट ५ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. चित्रपटाचे संगीत चित्रपट निर्माता-संगीतकार विशाल भारद्वाज यांनी दिले आहे. चित्रपटाचे गीत हे ज्येष्ठ गीतका गुलजार यांनी लिहिले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या