नवी दिल्ली : देशात सध्या कोरोना व्हायरसच्या रूग्णसंख्येत घट होत आहे.देशातील कोरोनाशी संबंधित सर्व निर्बंध आता संपुष्टात आले आहेत. तरीही मास्क वापरणे मात्र आवश्यक आहे. अशातच आता कोरोनाच्या ए या नव्या व्हेरियंटने चिंता वाढविली आहे. या व्हेरियंटबाबत नुकतीच डॉक्टर रवी गोडसे यांनी माहिती दिली असून, या व्हेरियंटला लोकांनी घाबरू नये, असे रवी गोडसे यांनी सांगितले आहे.
रवी गोडसे म्हणाले, काही वेळापूर्वी मी माझ्या ट्विटर अकाऊंटवर एक ट्वीट शेअर केले. या ट्वीटमध्ये मी ए या नव्या व्हेरियंटबद्दल सांगितले आहे. हा नवा व्हेरियंट ए हा तुम्हाला भीतीदायक वाटेल, पण त्यामध्ये तथ्य नाही. ए व्हेरियंट हा भारतासाठी घातक नाही. ओमिक्रॉनपेक्षा बीबी-२ संसर्गाचे प्रमाण जास्त होते. असे म्हटले जात होते की, डेल्टा क्रॉन धोकादायक आणि ऑमिक्रॉनसारखा जलद गतीने पसरणारा आहे. डेल्टा क्रॉन खतरनाक असू शकतो, पण ज्यांना ओमिक्रॉन झाला त्यांना डेल्टा क्रॉनची भिती नाही.
आता ए व्हेरियंट कसा आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. हा काय नवीन म्युटेशन नसून हा जुनाच आहे. याची पहिली केल इंग्लंडमध्ये १९ जानेवारीला आढळली होती. मात्र, आता सगळे चांगले चालू आहे. त्यामुळे चांगल्या गोष्टीला गालबोट लागू नये, म्हणू ही न्यूज देण्यात आली आहे. ए हा व्हेरियंट बीए आणि बीए २ हे दोघांचे कॉम्बिनेशन ए आहे. हा फास्ट म्युटेशन आहे. पण त्याचा भारताला धोका नाही. त्यामुळे घाबरू नका, असे आवाहन डॉ. गोडसे यांनी केले आहे.