26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeराष्ट्रीयतरच शेतकरी माघारी फिरतील

तरच शेतकरी माघारी फिरतील

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : गेल्या वर्षभराहून अधिक काळापासून दिल्लीच्या सीमारेषांवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन अद्याप संपलेले नाही. शेतक-यांच्या मागण्यांनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषि कायदे मागे घेण्याची घोषणा केली. त्यानुसार, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देखील या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

मात्र, यानंतर देखील आंदोलक शेतक-यांचे समाधान झालेले नसून अजूनही आंदोलन स्थळावरून शेतकरी माघारी फिरण्यास तयार नाहीत. यासंदर्भात भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका मांडली आहे. तसेच, केंद्राकडे आपल्या मागण्या देखील मांडल्या आहेत.

राकेश टिकैत यांनी माध्यमांशी बोलताना आंदोलनात आतापर्यंत मृत पावलेल्या शेतकरी आंदोलकांचा मुद्दा उपस्थित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषि कायदे मागे घेण्याची घोषणा जरी केली असली, तरी शेतक-यांना किमान आधारभूत किंमत आणि मृत्यू पावलेल्या ७०० शेतक-यांच्या कुटुंबियांसाठी नुकसानभरपाई हवी आहे, असे राकेश टिकैत म्हणाले.

केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली असेल, तर त्यासाठीचा कायदा ते करतीलच. पण किमान आधारभूत किंमत आणि ७०० हून जास्त शेतक-यांचा मृत्यू या गोष्टी देखील महत्त्वाच्या असून त्यावर सरकारने चर्चा करणे आवश्यक आहे. जर केंद्र सरकारने २६ जानेवारी २०२२ पूर्वी आमच्या मागण्या मान्य केल्या, तर शेतकरी आंदोलन मागे घेतील आणि आपापल्या घरी परततील, असे टिकैत म्हणाले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या