27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रतरुण-तरुणींनी पेटून उठले पाहिजे

तरुण-तरुणींनी पेटून उठले पाहिजे

एकमत ऑनलाईन

जळगाव : ‘वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्रातील दीड ते दोन लाख रोजगार गेला आहे. त्यामुळे सरकारविरोधात तरुण-तरुणींनी याविरोधात आवाज उठवला पाहिजे. सरकारनेही जनतेला वेड्यात काढू नये, आम्हीही राजकारण केले आहे. यापेक्षा दुसरा मोठा प्रकल्प राज्यात येणार असे लॉलीपॉप सरकारकडून दाखवले जात आहे. दुसरा प्रकल्प तर आलाच पाहिजे पण हासुद्धा प्रकल्प महाराष्ट्रात राहिला पाहिजे, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे. जळगाव येथील सभेत ते बोलत होते.

दरम्यान, येथील सभेत बोलताना त्यांनी अनेक मुद्यांवरून सरकारवर ताशेरे ओढले आहेत. महागाई, बेरोजगारी, शेतक-यांच्या प्रश्नावर सरकार गप्प का आहे? असा सवालही त्यांनी केला आहे. सध्या लम्पीमुळे शेतकरी हैराण झाला आहे. अतिवृष्टीमुळे शेतक-यांची पिकं वाहून गेली आहेत आणि हे सांगते सर्वसामान्यांचे सरकार. कसलं आलंय सर्वसामान्यांचं सरकार, नुकसानग्रस्त शेतक-यांना मदत देण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे पण आतापर्यंत एकाही शेतक-याला मदत मिळाली नाही. गाजर दाखवायचे धंदे या सरकारने बंद करावेत, अशा शब्दांत विरोधी पक्षनेत्यांनी सरकारला फटकारले आहे.

त्याचबरोबर, मुख्यमंत्री सकाळी सहा वाजेपर्यंत काम करतात असे सांगितले जातेय पण मग मुख्यमंत्री कधी उठतात? असा खोचक सवाल केला असून मुख्यमंत्र्यांच्या आणि सरकारच्या कामावर आक्षेप घेत वेदांता आणि फॉक्सकॉनबाबत तरुणांनी आवाज उठवला पाहिजे असे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या