23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeमहाराष्ट्र...तर बावनकुळे मुख्यमंत्री होऊ शकतात

…तर बावनकुळे मुख्यमंत्री होऊ शकतात

एकमत ऑनलाईन

फडणवीस यांच्या समोर गडकरी यांचे वक्तव्य
नागपूर : भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचा शनिवारी नागपूर येथे सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जर तरच्या भाषेत नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बावनकुळे मुख्यमंत्री होऊ शकतील, असे सूचक विधान विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत केले. जर फडणवीस दिल्लीत आले, तर बावनकुळे मुख्यमंत्री होऊ शकतात, असे ते म्हणाले. त्यावेळी एकच जल्लोष झाला.

चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा नागपूर येथील वसंतराव देशपांडे सभागृहात सत्कार करण्यात आला. त्यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी बोलत होते. यावेळी गडकरी यांनी या कार्यक्रमात बावनकुळे यांच्या आतापर्यंतच्या कामाचा आढावा आपल्या भाषणातून घेतला. काही कार्यकर्ते मेहनत करून पुढे येतात, तर काही मागच्या दारातून येतात. मात्र, बावनकुळे यांनी खूप मेहनत घेत परिश्रम केले, असे गडकरी म्हणाले.

पक्ष वाढविण्यासाठी ते महाराष्ट्रात फिरले. ऊर्जा खात्यात त्यांनी मोठे काम केले आहे. विजेचे कनेक्शन शेतक-यांना मिळत नव्हते ते त्यांनी मिळवून दिले, अशा शब्दांत गडकरींनी बावनकुळेंचं कौतुक केले. बावनकुळे यांच्याकडे एवढे कर्तृत्व आहे की ते केव्हा माणसाला बाई आणि बाईला माणूस बनवतील, हे सांगता येत नाही. म्हणजे कुठले काम कसे करायचे आणि निधी कसा मिळवायचा, हे त्यांना कळते, असे गडकरींनी आपल्या भाषणात म्हटले. याच कौशल्यामुळे त्यांनी नागपूर शहराच्या विकासासाठी मोठया प्रमाणात निधी आणला असे उद्गार गडकरींनी बावनकुळेंच्या व्यवस्थापकीय कौशल्याबद्दल बोलताना काढले.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या