इंदौर : इंदौरमधील सानवर रोडवर काही विशिष्ट वर्गाच्या लोकांनी जमिनीवर अतिक्रमण केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांनी हे अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्याची मागणी केली आहे. आपण तळागाळातल्या प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे. काश्मीर फाईल्स सारखे चित्रपट पाहून आपल्या डोळ्यात अश्रू येतात पण त्यापेक्षा मोठ्या फाईल्स इथल्या गल्ल्यांमध्ये घडत आहेत.
आपल्याला या तळागाळातल्या वेगवेगळ्या कटांना उखडून काढायचे आहे. ही माझी नम्रपणे विनंती आहे असे उषा ठाकूर लघु उद्योग भारतीच्या २९ व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने बोलताना म्हणाल्या. केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री भानु प्रताप सिंग वर्मा आणि खासदार सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री ओमप्रकाश सकलेचा यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यान उषा ठाकूर यांनी मंत्र्यांच्या आणि संबंधित अधिका-यांच्या उपस्थितीत या प्रश्नावर बोट ठेवले.