- मंत्री, लष्करी अधिकारी शिक्षा पाहण्यासाठी स्टेडियममध्ये
काबूल : अफगाणिस्तानच्या फराह प्रांतात बुधवारी खुनाचा आरोपी असलेल्या एकाला सार्वजनिकरित्या मृत्युदंड देण्यात आला. हजारोंनी खचाखच भरलेल्या जमावासमोर हा आरोपीला मशीनगनमधून गोळ््या झाडत मृत्यूदंड देण्यात आला.
अफगाणिस्तानावर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर सार्वजनिक मृत्युदंडाची ही पहिलीच घटना आहे. जशास तसा न्याय देत मृताच्या वडिलांनी असॉल्ट रायफलने तीन गोळ्या झाडून आपल्या मुलाच्या खुनाचा बदला घेतला. सार्वजनिकरित्या देण्यात आलेली ही शिक्षा पाहण्यासाठी अनेक तालिबानी नेते उपस्थित होते. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश, लष्करी अधिकारी आणि अनेक वरिष्ठ मंत्रीही शिक्षा पाहण्यासाठी आले होते.
पाच वर्षांपूर्वी केला होता गुन्हा
हेरात प्रांतात तजमीर नावाच्या व्यक्तीने फराह प्रांतातील एका व्यक्तीची हत्या करून त्याची मोटारसायकल आणि फोन चोरला होता. मृताच्या कुटुंबीयांनी आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर त्याला अटक झाली होती. गेल्या महिन्यात तालिबानचा सर्वोच्च नेता हैबतुल्ला अखुंदजादा याने या शिक्षेची घोषणा केली होती.