26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeमहाराष्ट्रतिढा सुटणार की वाढणार?

तिढा सुटणार की वाढणार?

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्य सरकारने एसटी कर्मचा-यांच्या वेतनात घसघशीत वाढ करण्याची घोषणा आज परिवहनमंत्री अनिल परब यांनी केली आणि संप मागे घेण्याचे आवाहन केले. मात्र, वेतनवाढ ही कर्मचा-यांची फसवणूक असून, जोपर्यंत एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलिनीकरण होत नाही, तोपर्यंत कर्मचा-यांचे आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका आझाद मैदानावरील आंदोलकांसह राज्यातील अनेक कर्मचा-यांनी घेतली आहे. मात्र, एसटी कर्मचा-यांच्या अनेक संघटना आहेत.

त्या काय भूमिका घेतात, हे अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे तोडगा निघूनही तिढा अजून कायम आहे. मात्र, सर्वांशी चर्चा करून गुरुवारी सकाळी संपाबाबत निर्णय जाहीर केली जाईल, असे आ. सदाभाऊ खोत व गोपीचंद पडळकर यांनी सांगितले. मागील १५ दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचा-यांचा संप सुरू आहे. एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलिनीकरण व्हावे, अशी कर्मचा-यांची मूळ मागणी आहे. तसेच वेतनवाढ आणि वेळेत पगार व्हावी, अशीही मागणी करण्यात आली होती.

त्यातच हे प्रकरण हायकोर्टात असल्याने आणि मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भात एक त्रिसदस्यीय समिती नेमल्याने त्यांचा अहवाल येईपर्यंत राज्य सरकारने विलिनीकरणाचा निर्णय घेता येणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली. मात्र, तो अहवाल येईपर्यंत संप सुरू ठेवणे एसटी महामंडळ आणि कर्मचा-यांना परवडणार नाही. कारण ग्रामीण भागात गैरसोय होत आहे, असे परब यांनी सांगितले. त्यातूनच राज्य शासनाने वेतनवाढीचा प्रस्ताव कर्मचा-यांपुढे ठेवला. त्यातून ४१ टक्के इतकी घसघशीत वाढही केली. परंतु हा वेतनवाढीचा प्रस्ताव अमान्य असल्याचे आझाद मैदानावरील आंदोलकांनी जाहीर केले. तसेच इतर ठिकाणीही कर्मचारी ठाम असल्याचे समोर आले आहे.

संपाबाबत आज निर्णय
सरकारने घसघशीत वेतनवाढ जाहीर केल्यानंतर आंदोलनाचे नेतृत्व करणा-या सदाभाऊ खोत व गोपीचंद पडळकर यांनी समाधान व्यक्त केले. प्राप्त परिस्थितीत जे काही करणे शक्य आहे, ते सरकारने केल्याचे त्यांनी मान्य केले. आझाद मैदानावर आंदोलन करणा-या कर्मचा-यांशी चर्चा करून पुढील निर्णय जाहीर करू, असे त्यांनी सांगितले. आंदोलनस्थळी आलेल्या खोत व पडळकर यांनी सर्वांशी चर्चा करून गुरुवारी सकाळी संपाबाबत भूमिका स्पष्ट केली जाईल, असे सांगितले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या