30.4 C
Latur
Monday, February 6, 2023
Homeराष्ट्रीयतीन हिंदू नेत्यांच्या हत्येचा प्लॅन, तारीखही निश्चित

तीन हिंदू नेत्यांच्या हत्येचा प्लॅन, तारीखही निश्चित

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी रविवारी भलस्वा डेअरीजवळ अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांच्या चौकशीतून सोमवारी धक्कादायक माहिती समोर आली. या दोघांनी तीन हिंदू नेत्यांची हत्या करण्याची योजन आखली होती. त्याची तारीखही नश्चित केली होती, असे त्यांनी कबूल केले.

ज्या ठिकाणी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले, तिथे रक्ताचे डाग आढळून आले आहेत. तपासादरम्यान पोलिसांना राजकुमारचे शीर आणि हाताचे तुकडे सापडले होते. या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेले नौशाद आणि जगजीत सिंह हे दोघे २७ आणि ३१ जानेवारीला तीन हिंदू नेत्यांना जीवानीशी मारणार होते. पंजाब आणि दिल्लीतील दक्षिणपंथी नेते त्यांच्या हिटलिस्टवर होते. त्यातील दोन नेत्यांची रेकी देखील त्यांनी केली होती.

मिळणार होते कोट्यवधी रुपये
पहिल्या नेत्याची हत्या केल्यानंतर या दहशतवाद्यांना ५० लाख, दुस-या नेत्याच्या हत्येनंतर १ कोटी आणि तिस-या नेत्याच्या हत्येसाठी १.५ कोटी रुपये मिळणार होते. त्यासाठी टोकन म्हणून त्यांना ५ लाख रुपये देखील देण्यात आले. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या