37.8 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeमहाराष्ट्रतीस-तीस घोटाळा प्रकरणी दुसरा गुन्हा

तीस-तीस घोटाळा प्रकरणी दुसरा गुन्हा

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : मराठवाड्यासह महाराष्ट्रात खळबळ उडवून देणा-या बहुचर्चित तीस-तीस घोटाळ््यात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबादसह मराठवाड्यातील शेकडो शेतकरी, अधिकारी, राजकीय नेत्यांनी या तीस-तीस योजनेत पैसे गुंतवणूक केली होती. मात्र वर्षभरापासून या योजनेचा मास्टरमाईंड संतोष उर्फ सचिन राठोड पैसे परत देतो म्हणून टाळाटाळ करत होता, तर काही दिवस तो फरार झाला होता.

तीस-तीस घोटाळ््या प्रकरणी औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, आरोपी संतोष राठोडला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी संतोष राठोड याने ६० ते ७० कोटींची लोकांनी माझ्याकडे गुंतवणूक केल्याचे कबूल केले होते. मात्र प्रत्यक्षात ४०० ते ५०० कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी आता दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील संतोष राठोड नावाच्या तरुणाने या शेतक-यांना माझ्याकडे पैसे गुंतवा आणि मासिक ३० टक्के परतावा मिळावा, अशी योजना आणली आणि यात अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केली.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या