22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeमहाराष्ट्रतुपकर यांची प्रकृती खालावली

तुपकर यांची प्रकृती खालावली

एकमत ऑनलाईन

संतप्त कार्यकर्त्यांनी तहसीलदारांची गाडी पेटवली
बुलडाणा : सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकºयांच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रवीकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन पुकारले आहे. आज चौथ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावल्यामुळे संतप्त झालेल्या समर्थक आणि शेतकºयांनी तहसीलदाराची गाडी पेटवून दिली.
सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकºयाच्या मागणीसाठी रवीकांत तुपकर यांनी आपल्या राहत्या घरीच आंदोलन पुकारले आहे. मागील ४ दिवसांपासून त्यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. आज तुपकरांची प्रकृती खालावली. त्यामुळे शेतकरी व कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी बुलडाणा तहसीलदार यांची गाडी पेटवून दिली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तुपकर आपल्या मागण्यावर ठाम आहेत.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच रवीकांत तुपकरांची प्रकृती खालावली असताना त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाची दखल घेतली जात नाही. त्यामुळे सरकारला किती बळी पाहिजेत म्हणत स्वाभिमानी अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख रफिक शेख करीम यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत अन्नाचा कण घेणार नाही, या भूमिकेवर तुपकर ठाम असताना एका पदाधिकाºयाने चक्क अन्नत्याग आंदोलनस्थळी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्ते व पोलिसांमध्ये तुफान राडा झाला. पोलिसांनी लगेच आत्मदहन करणाºयाला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
बुलडाणा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रवीकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शेतकºयांनी अचानक एकत्र येत सडलेले सोयाबीन जाळून आंदोलन केले. सरकारने जाहीर केलेली मदत तोकडी असून अतिवृष्टीग्रस्तांना ५० हजार रुपये मदत देण्यात यावी, सोयाबीनचा प्रति क्विंटल दर ८ हजार रुपये व कापसाचा प्रति क्विंटल दर १२ हजार रु.स्थिर राहावा यासाठी केंद्र सरकारने धोरण आखावे, ओला दुष्काळ जाहीर करावा यासह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या