27.3 C
Latur
Monday, January 30, 2023
Homeमहाराष्ट्रतुम्हाला चांगले बोलले तरी पटत नाही...

तुम्हाला चांगले बोलले तरी पटत नाही…

एकमत ऑनलाईन

– एकनाथ शिंदे यांचा जितेंद्र आव्हाडांना खोचक टोला
नागपूर : नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा हा दुसरा आठवडा असून गुरुवारी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावादरम्यान विदर्भातील अनुशेषाबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. दरम्यान, यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात शाब्दिक वाद झाल्याचे बघायला मिळाले .

विदर्भातील अनुशेषाबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जितेंद्र आव्हाडांचा उल्लेख केला. ज्यावेळी मी एमएसआरडीसीचा मंत्री होतो तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. मात्र, माझ्या खात्याकडे तेव्हा काहीही काम नव्हते. तेव्हा मी देवेंद्र फडणवीसांना म्हणालो की, मी काम करणारा कार्यकर्ता आहे. पण माझ्याकडे सध्या काहीही काम नाही. तेव्हा त्यांनी मला समृद्धी महामार्गाची जबाबदारी दिली.

याबाबत जितेंद्र आव्हाडांना माहिती होते. तेव्हा ते मध्ये-मध्ये समृद्धी महामार्ग दिलाय असं बोलायचे, असे ते म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या विधानावर जितेंद्र आव्हाडांनी आक्षेप घेतला, मी असं कधी म्हणालोच नव्हतो, असे ते म्हणाले. त्याला प्रत्युत्तर देताना, मी चांगले बोलायला गेलं तरी तुम्हाला आवडत नाही, असे खोचक उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद बघायला मिळाला. अखेर अध्यक्षांनी हस्तक्षेप करत या दोघांनाही शांत केले.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या