29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeराष्ट्रीयतेलंगणात शाळेत ४५ विद्यार्थ्यांना संसर्ग

तेलंगणात शाळेत ४५ विद्यार्थ्यांना संसर्ग

एकमत ऑनलाईन

हैदराबाद : ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका लक्षात घेत केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले असतानाच तेलंगणामधून आलेल्या बातमीने खळबळ उडाली आहे. तेलंगणात एकाच शाळेतील ४५ विद्यार्थी आणि एक शिक्षक अशा ४६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून आरोग्य यंत्रणा हादरून गेली आहे.

तेलंगणामधील संगारेड्डी जिल्ह्यात मुथंगी या गावातून कोरोनाबाबत चिंता वाढवणारा प्रकार समोर आला. या गावात महात्मा ज्योतिबा फुले गुरुकुल या शाळेतील ४५ विद्यार्थ्यांचा तसेच एका शिक्षकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे सर्व संबंधित यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या