नवी दिल्ली : लांबच लांब रांग टाळण्यासाठी भारतातील थायलंड दुतावासाने भारतीयांना दुतावास अथवा वाणिज्य दुतावासातून व्हिसा घेण्याचा सल्ला दिला आहे. थायलंडने आपल्या सीमा पर्यटनासाठी उघडल्या असून बँकॉक विमानतळावर प्रवासी आणि पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामुळे बँकॉक विमानतळावर प्रवाशांच्या लांब रांगा लागल्या आहेत. रांगांमध्ये इमिग्रेशन क्लियरन्स आणि ऑन अरायव्हल व्हिसा देण्यांची संख्या जास्त आहे. थायलंडनुसार, या जानेवारी ते ऑगस्टपर्यंत ३७.८ लाख पर्यटक येतील.