18.6 C
Latur
Thursday, February 2, 2023
Homeउद्योगजगतदक्षिणात्य आर्ट दिग्दर्शक सुनील बाबू यांचे निधन

दक्षिणात्य आर्ट दिग्दर्शक सुनील बाबू यांचे निधन

एकमत ऑनलाईन

हैदराबाद , वृत्तसंस्था : दक्षिणात्य चित्रपटसृष्टी अर्थात टॉलीवूडला आधुनिकतेचा साज चढविणारे प्रसिद्ध आर्ट दिग्दर्शक सुनील बाबू यांचे निधन वयाच्या ५० व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तीन दिवस आधी त्यांच्या पायाला सूज आली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने कलाविश्वात शोककळा पसरली आहे.

चित्रपट निर्मात्या अंजली मेनन यांनी सुनील बाबू यांच्या निधनाची माहिती दिली. अभिनेता दुलकर सलमानने सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. सुनील बाबू यांनी मल्याळम, तेलुगू, तामिळ आणि ंिहदी चित्रपटांमध्ये आर्ट दिग्दर्शक आणि प्रोडक्शन डिझायनर म्हणून काम केले आहे. त्यांनी साबू सीरिलमधून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून मनोरंजसृष्टीत एंट्री केली होती. सुनील बाबू यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

 

सुनील यांनी दाक्षिणात्य चित्रपटांसह हिंदीतही काम केले आहे. सिंग इज किंग, एमएस धोनी, पा, लक्ष्य, स्पेशल २६ सारख्या चित्रपटांसाठी त्यांनी आर्ट डायरेक्टर म्हणून काम केले आहे. त्याशिवाय त्यांनी रोज या हॉलिवूड चित्रपटासाठीही आर्ट दिग्दर्शक म्हणून काम केले. अनंतभद्रम, बँगलोर डेज, उरुमी, प्रेमम, नोटबुक, कायमकुलम कोचुन्नी आणि छोटा मुंबई हे त्यांचे प्रसिद्ध चित्रपट आहेत. त्यांना अनंतभद्रम चित्रपटासाठी बेस्ट आर्ट डायरेक्टर म्हणून केरळ स्टेट फिल्म अवॉर्डही मिळाला होता.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या