29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeक्रीडादक्षिण आफ्रिकेचा भारतावर ७ गडी राखून विजय

दक्षिण आफ्रिकेचा भारतावर ७ गडी राखून विजय

एकमत ऑनलाईन

केपटाऊन : केपटाऊनमधील भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा आणि निर्णायक कसोटी सामना दक्षिण आफ्रिकेने ७ गडी राखून जिंकला. या विजयाने दक्षिण आफ्रिकेने तीन कसोटी सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली.
भारताने आफ्रिकेत २०१०-११ साली कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली होती. तीच भारताची आफ्रिकेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. दक्षिण आफ्रिकेने केवळ ३ गडांच्या बदल्यात २१२ धावांचे लक्ष्य पार केले. या सामन्या दरम्यान पीटरसनने ८२ धावांची निर्णायक खेळी केली.

त्याला शार्दुल ठाकूरने आउट केले. भारताचा दुसरा डाव काल १९८ धावांवर संपुष्टात आला होता. भारताकडून रिषभ पंतने झुंजार शतकी खेळी केली. यष्टिरक्षक फलंदाज पंतने केलेल्या खणखणीत शतकाच्या जोरावर भारताने दुस-या डावात १९८ धावांपर्यंत मजल मारली होती. पहिल्या डावातील १३ धावांच्या आघाडीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २१२ धावांचे लक्ष्य दिले होते. हे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेने ३ गडांच्या बदल्यात पार केले. १९९२-९३ पासून आजपर्यत म्हणजे तीस वर्षात भारताला दक्षिण आफ्रिकेच्या मायभूमीवर एकदाही कसोटी मालिका जिंकता आली नाही.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या