26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeराष्ट्रीयदम असेल तर तृणमूलच्या चिन्हावर लढा

दम असेल तर तृणमूलच्या चिन्हावर लढा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : मेघालयात माजी मुख्यमंत्र्यांसह १२ काँग्रेस आमदार तृणमूल काँग्रेसमध्ये गेले आहेत. यामुळे तृणमूल काँग्रेस २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत एकही जागा न जिंकता मेघालयच्या विधानसभेत प्रमुख विरोधी पक्ष ठरला आहे. आता मेघालयातले राजकारण तापले आहे. काँग्रेसने ममता बॅनर्जी यांच्यावर घोडेबाजार केल्याचा आरोप केला आहे. काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले की, ममता बॅनर्जी या घोडेबाजार करत आहेत. मी आव्हान देतो की त्यांच्या आमदारांमध्ये हिंमत असेल तर काँग्रेसचे निवडणूक चिन्ह सोडून तृणमूलच्या तिकिटावर लढवून दाखवावे.

मुकुल संगमा, लुइजिनो फलेरिओ आणि प्रशांत किशोर मिळून हे षडयंत्र रचत आहेत. या नॉर्थ इस्ट नेत्यांना मी ओळखतो दिवसा एक आणि रात्री वेगळेच असते असेही अधीर रंजन यांनी म्हटले. मी ममता बॅनर्जी यांना आव्हान देतो की, त्यांनी आधी आमदारांना तृणमूलच्या निवडणूक चिन्हावर जिंकवून दाखवावे. त्यानंतर त्यांना पक्षात घ्यावे असेही काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी म्हणाले.

काँग्रेसला उध्दवस्त करण्याचे षडयंत्र
काँग्रेसला उद्ध्वस्त करण्याचे हे षडयंत्र फक्त मेघालयातच नाही तर नॉर्थ इस्टच्या सर्व राज्यात होत आहे. आधीपासूनच मेघायलयात हे होणार माहिती होते. तृणमूलमध्ये गेलेले आमदार हे काँग्रेसच्या चिन्हावर जिंकले असल्याचेही अधीर रंजन यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या